Top News महाराष्ट्र वाशिम

मुख्याध्यापक-शिक्षक बैठकीत गावठी कट्टा घेऊन पोहोचला तरुण, घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

वाशिम | वाशिम जिल्ह्यातील माळेगाव तालुक्यात एका विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याधापकावरच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला गोळीबार करण्यासाठी पिस्तुल खरेदीसाठी त्याच शाळेतील शिक्षकाने गावठी कट्टा खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते.

सुशांत खंडारे, असं गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सुशांतला शाळेत शिकत असल्याचा  निर्गम उतारा हवा होता. यासाठी त्याने अर्ज केला होता. मात्र त्याला काही अर्ज मिळत नव्हता. त्याने अर्ज मिळवायला उशिर होत असल्याच कारण पुढे करत तो शाळेच्या कार्यलयात गेला त्यावेळी पाच ते सहा शिक्षकांसह मुख्याधापक बसलेले होते. सुशांतने आतमध्ये गेल्यावर जवळचा कट्टा काढत मुख्याधापकांना धमकावत त्यांच्यावर गोळी झाडली मात्र नशिबाने ती गोळी लागली नाही. गोळी झाडल्यावर सुशांतने पिस्तुल तिथेच टाकत तिथून पळ काढला.

एक विद्यार्थी केवळ एका उताऱ्यासाठी गोळी झाडू शकत नाही म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले, कर्मचारी गजानन काळे, सुधीर सोळंके आणि इतरांनी या युवकाला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्यांची चौकशी केली यामध्ये धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. त्या मुलाला शाळेतील एका शिक्षकानेच हे करण्यास सांगतिलं होतं.

दरम्यान, त्या शाळेचा आधीचे मुख्याधापक गजानन इंगळे यांच्याकडे होता. मात्र त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून विजय बोरकर या शिक्षकाकडे देण्यात आली. त्यामुळे इंगळे यांनी सुशांतच्या डोक्यात भरवून कट्टा खरेदीसाठी 40 हजार रुपये दिले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

संकटकाळात कर्मचाऱ्यांशी असे वागता, हीच का तुमची नीतिमत्ता? रतन टाटा यांचे कंपन्यांना खडे बोल…

नको तिथं मास्क लावून फिरला तरुण; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

2 जण मोटारसायकलवरुन आले, सत्तूरनं 16 वार केले; महालक्ष्मी मंदिरासमोरच हत्येचा थरार!

तलाठ्यानं वाळूचा ट्रक पकडला, पोलीस चौकीकडं जात असतानाच गायब झाला!

नेते, आमदारांना झालाय कोरोना, मात्र देशात पहिल्यांदाच ‘या’ मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या