बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सिद्धार्थ माझा प्रियकर नाही पण तो सतत आजूबाजूला हवासा वाटतो”

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ‘कबीर सिंग’ चित्रपटानंतर प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. या चित्रपटामधील तिच्या साधेपणाने अनेक मुलांच्याच नव्हे तर मुलींच्या देखील मनावर राज्य केलं आहे. अशातच कियारा आणि बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा डेटींग करत होते, अशी बातमी समोर आली होती. मात्र त्यांचं आता ब्रेकअप झाल्याचं देखील बोललं जात आहे. या चर्चांवर खुद्द कियाराने खुलासा केला आहे.

कियारा आणि सिद्धार्थ यांनी प्रथमच एका चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केल्यानंतर अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पाॅट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात या दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान, हे दोघे डेट करत असल्याची चर्चा समोर आली होती.

डेटींगनंतर आता कियारा आणि सिद्धार्थचा ब्रेकअप झालं असल्याचं समोर आलं आहे. यानंतर कियाराने एक इंटरव्ह्यूमध्ये ही बाब स्पष्ट केली आहे. सिद्धार्थ माझा अगदी जवळचा मित्र आहे, त्याच्यामध्ये आनंदी ठेवणारा असून तो सतत आजूबाजूला असावा असं वाटतं, असं कियाराने यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, या दोघांमध्ये नक्की काय संबंध आहेत याबाबत दोघांपैकी कोणीही उघडपणे बोलत नाही. यामुळे चाहते देखील गोंधळून गेले आहेत. या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सिद्धार्थ खूप आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करणारा आहे. त्याचं वाचन देखील खूप चांगलं असल्याचं कियाराने सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी दिला चोप

जावयाच्या प्रेमात आकंठ बुडाली सासू, केलं असं काही की…

…अशाप्रकारे गॅस बुक केल्यास मिळेल 2700 रुपयांचा कॅशबॅक, वाचा धमाकेदार ऑफर!

अश्लील व्हिडीओ प्रकरणात आता शर्लिननं साधला राखी सावंतवर निशाणा, म्हणाली…

रक्त शोधण्यासाठी आई रात्रभर धडपडली, अखेर डाॅक्टरच बनले देवदूत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More