अभिमानास्पद! सहाच्या सहा बहिणी पोलिस दलात; अनिल देशमुखांनीही केलं कौतुक
कोल्हापूरमधील | महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात काही न काही परंपरा असते. प्रत्येकाच गावात काही वेगळं असतं. प्रत्येक गावाची एक ओळख असतेच. कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील वाघवेवाडी हे गाव नुकतचं चर्चेत आलं आहे. त्याला कारण ठरलंय गावातल्या 6 बहिणी.
पन्हाळा तालुक्यातील वाघवेवाडी या गावात भोसले कुटूंब राहतं. सुरेश, चंद्रकांत आणि प्रकाश हे तीन भोसले बंधू या गावात राहतात. या तिन्ही भावंडांना मिळून एकूण सहा मुली आहेत. सुुवर्णा, सोनाली, रूपाली, सारिका, विमल आणि सुजाता, अशी या सहा बहिणींची नावं आहेत. या सहाही बहिणी सध्या पोलिस विभागात कर्तव्य बजावत आहेत. आपल्या मोठ्या बहिणीचा आर्दश घेत बाकीच्या पाचही बहिणींनी पोलिस विभागात जाण्याचा निर्णय घेतला आणि या सहाही जणी आज राज्याच्या विविध भागात आपलं कर्तव्य बजावत आहेत.
पन्हाळाच्या अतिशय दुर्गम भागात या मुलींनी मोठ्या जिद्धीने शिक्षण घेतलं, सर्वात मोठी मुलगी सुवर्णा ही 2008 मध्ये पोलिस दलात भरती झाली. आजोबांनी पाठिंबा दिल्यानंतर या सहाही बहिणी पोलिस दलात रूजू झाल्या आहेत. महिला दिनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख अणि खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून या सहाही बहिणीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात असलेल्या भोसले कुटुंबाने घरातील 6 मुलींना पोलीस सेवेत भरती करून देशसेवेचा वेगळाच आदर्श घालून दिला आहे. या सहाही मुलींसह भोसले कुटुंबाचे सामाजिक योगदान प्रेरणादायी आहे, अशा शब्दात गृहमंत्र्यानी त्यांचं कौतुक केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
चिंताजनक! ‘कोरोना’ लसीचे डोस घेऊनही जिल्हाधिकारी आढळले ‘कोरोना पॉझिटिव्ह’
मोठी बातमी! सचिन वाझेंची ‘या’ विभागात करण्यात आली बदली
पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले…
अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणार भारताचा ‘अलिबाबा’; जाणून घ्या अधिक माहिती…
Comments are closed.