बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर 100 दिवसात पुण्यातील लोकसंख्येचं लसीकरण होऊ शकतं”

पुणे | जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने परवानगी दिली तर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून येत्या 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचं लसीकरण केलं जाऊ शकतं, असं मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी सांगितलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

आपण जर पुण्यात प्रत्येक दिवशी एक लाख लोकांना कोरोनाची लस दिली तर येत्या दोन महिन्यात पुण्यातल्या सगळ्या लोकांचं लसीकरण पूर्ण होऊ शकतं. पुण्यातल्या लसीकरणाचं हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्या संबंधी नियोजनही तयार असल्याचं सुधीर मेहता यांनी म्हटलं आहे.

‘पुण्याची लोकसंख्या जवळपास 75 लाख आहे. त्यामध्ये 33 लाख लोकसंख्या ही 20 वर्षाच्या आतील आहे. त्यामुळे 20 वर्षापुढील असणाऱ्या 42 लाख लोकसंख्येचं लसीकरण करणं हे आमचं ध्येय आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन असे 84 लाख कोरोनाचे डोस गरजेचे आहेत. पण आमच्या अनुभवानुसार सध्या केवळ 60 ते 65 टक्के लोकसंख्येला कोरोनाच्या लसीची गरज असल्याचं मेहता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसंख्येमधील 25 लाखमधील 10 लाख लोकसंख्या ही 40 वर्षापुढील आहे आणि 15 लाख लोकसंख्या ही 20 ते 40 वर्षामधील आहे. यांच्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस द्यायचे झाले तर अशा तीन प्रकारे ते डोस देता येतील, असंही मेहतांनी सांगितलं आहे. यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार याची दखल घेतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या

पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांमधला वाद पेटला, भावाविरोधात फिर्याद दाखल

मोठी बातमी! राज्यात नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील

मलाच चपलीने मारलं! ‘या’ कारणाने महिलेच्या नाकातून येत होतं रक्त, डिलिव्हरी बॉयचा वेगळाच दावा

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More