नवी दिल्ली | सोमवारी केंद्र सरकारने जीएसटीची भरपाई म्हणून 20 हजार कोटी रुपये राज्यांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यादर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.
42व्या जीएसटीच्या बैठकीतनंतर निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, जमा झालेल्या करांमधून जीएसटीची भरपाई राज्यांना सोमवार रात्रीपर्यत वितरीत केली जाईल.
जीएसटी नुकसान भरपाई देण्यास आम्ही नकार दिलेला नाही. जीएसटी कायदा बनवला गेला तेव्हा कोरोनासारख्या साथीच्या आजाराचा विचार केला गेला नव्हता. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारच्या जीएसटीवर कब्जा केलेला नसल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
च्या उपचारादरम्यानचा संजय दत्तचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
“रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?”
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्ण दगावल्यास कुटुंबीयांना भरपाई द्या- उच्च न्यायालय
‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली