बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आयेगा”

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपल्याची पहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर गृहमंत्री अनिल देशमुख आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी  आरोप प्रत्यारोपांसाठी चक्क शेरोशायरींतून प्रत्युत्तर दिलं आहे. देशमुखांना शेर ऐकवत ‘तुम्हारे पास सिर्फ तीन महिने का वक्त बचा है’ असा इशाराही मुनगंटीवार यांनी यावेळेस दिला आहे.

सुधीरभाऊ तुम्हाला पाहून जगजितसिंहच्या ‘तुम इतना जो मुस्कुरा रहें हो सुधीरभाऊ क्या गम है जिसे छुपा रहै हो’  या शेरची आठवण होते असं म्हणत  देशमुख यांनी मुनगंटीवारांना हळूच  कोपरखळी मारली होती. मुनगंटीवारांनीही देशमुखांच्या या प्रश्नाला अगदी तशाच स्वरुपाचा एक शेर सुनावत प्रत्युत्तर दिलं आहे.

कुछ देर की खामोशी है फिरसे शोर आयेगा तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आयेगा, असा मुनगंटीवारांनी टोला लगावल्यावर उपस्थित भाजप आमदारांकडूनही मुनगंटीवारांना जोरजोराने बाकं वाजवून प्रतिसाद देण्यात आला. मात्र ‘तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है’ या वाक्यावरुन खरंच राज्यात सत्तापालट होणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय पटलावर उपस्थित झाला आहे.

दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. भाजप महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नसल्याचं सध्या विधानसभेत बघायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…ते दृश्य पाहून रात्रभर झोपू शकलो नाही”, भर सभागृहात मुख्यमंत्र्याना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

‘…अशावेळी आर. आर. पाटील असते तर’; मनसुख हिरेन प्रकरणावर मनसेची प्रतिक्रिया

महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!

‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More