बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्री बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ

मुंबई | महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या राॅयल स्टोन बंगल्यावरील विशेष अधिकारी दालनात एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीचे नाव पांडुरंग वाघ असं आहे.

पांडुरंग वाघ यांनी 2018 मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा परवाना शासनाकडून मिळवला होता. यासाठी त्यांनी शासनाकडे 8 लाख 72 हजार रूपये भरले होते. परंतु स्थानिकांनी त्यांच्या वाळू उत्खननाला विरोध केला. त्यानंतर त्यांनी शासनाकडे भरलेले पैसे परत मिळावे यासाठी बाळासाहेब थोरातांच्या विशेष अधिकारी दालनात पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला.

पांडुरंग वाघ हे अहमदनगरमधील नेवासा येथील झापडी गावाचे रहिवाशी आहेत. 2018 मध्ये त्यांना वाळू उत्खननाचा परवाना मिळाला. मात्र स्थानिकांनी याला विरोध केल. स्थानिकांपासून सातत्याने विरोध होत असल्याने मिळालेलं काम त्यांना पूर्ण करता नाही. त्यामुळं त्यांचं काम गेली दोन वर्षापासून रखडलेलं होतं. आपले पैसे परत मिळावेत या मागणीसाठी बाळासाहेब थोरातांकडे आले असताना त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

दरम्यान, वाघ यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी सीआरपीसी 41(1) अंतर्गत कारवाई केली होती, त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी देखील वाघ यांना असं पाऊल पुन्हा न उचलण्याची समज दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

कुख्यात गुंड गजा मारणेला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद; पाहा CCTV फुटेज

पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांना मोठा धक्का; 2 कुख्यात टोळ्यांमधील ‘या’ 13 जणांवर मोक्का!

…म्हणून या माणसाने चक्क कांगारुच्या कानाखाली वाजवली, कांगारुही हैराण, पाहा व्हिडीओ

धक्कादायक!; अवघ्या चार ते पाच हजार रुपयात कोरोनाच्या बनावट अहवालाची विक्री

रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवणं आता आणखी महाग; 50 रुपये मोजावे लागणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More