Top News देश

“दम असेल कर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची झाली तरी द्या”

नवी दिल्ली | दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं गेले 10 दिवस आंदोलन चालू आहे. अशातच या आंदोलनावरून बिहारमध्येही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आंदोलन केलं आहे.

आंदोलन केलं म्हणून तेजस्वी यादव यांच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे. यावरून यादव यांनी नितीश सरकारवर निशाणा साधत आव्हानही दिलं आहे. घाबरट मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल आमच्याविरोधात FIR दाखल केला असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

तुमच्यात दम असेल तर मला अटक करा. मी वाट पाहिन. नाही केलं तर मी स्वत: हून अटक होईन. शेतकऱ्यांसाठी FIR काय फाशीदेखील द्यायची असेल तर द्या, असंही यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देत महागठबंधनच्या सर्व पक्षांसोबत पाटणातील गांधी मैदानात आंदोलन केलं.

 

महत्वाच्या बातम्या-

‘..तर मीपण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार’; विजेंदर सिंगचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

कोहलीने कॅच सोडूनही मॅथ्यू वेड झाला बाद, पाहा व्हिडीओ

‘केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही’; पाटलांचं पवारांना उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उर्मिला मातोंडकर यांचा प्रतिसाद; केलं सर्वात श्रेष्ठदान

रक्तदानाच्या बदल्यात चिकन आणि पनीर; शिवसैनिकाच्या ऑफरची सोशल मीडियावर चर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या