बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

7 मुलांच्या 67 वर्षीय बापाने केला 19 वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह, केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली | हरियाणा येथील पलवल येथे सर्वांना हैराण करणारी घटना घडली आहे. एका 67 वर्षाच्या वृद्धाने अवघ्या 19 वर्षांच्या तरुणीसोबत लग्नगाठ बांधली असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी प्रेमविवाह केला असून आता यांनी कोर्टाकडे धक्कादायक मागणी केली आहे.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण या वाक्याचं जागतं उदाहरण देणारी घटना म्हणजे हरियाणातील ही घटना आहे. 67 वर्षीय व्यक्तीचं आधी देखील लग्न झालं आहे. मात्र त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं असून त्याला सात मुलं देखील आहेत. सातही मुलांची लग्न झाली आहेत. तसेच या व्यक्तीच्या नवीन पत्नीचं देखील पहिलं लग्न झालं आहे.

संबंधित तरुणी ही 19 वर्षाची आहे. या तरुणीचा तिच्या गावातील एका व्यक्तीसोबत जमिनीचा वाद सुरु होता. यात संबंधित 67 वर्षीय वृद्ध तिला मदत करत होता. यादरम्यान, दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. यानंतर दोघांचा प्रेमविवाह पार पडला. मात्र दोघांनीही कोर्टात याचिका दिली आहे.

दरम्यान, दाम्पत्याने कोर्टात सुरक्षतेची मागणी करत याचिका दिली आहे. यानंतर कोर्टाने या प्रकरणाला गांभिर्याने घेत तरुणीला सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला आहे. तसेच व्यक्तीची माहिती मिळवण्याचं काम देखील पोलिसांना देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण

“चित्रा वाघ यांना शिवसेनेत यायचं होतं पण शिवसेनेनं प्रवेश नाकारला, त्यामुळे त्या…”

‘या’ विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात 1000 पटीनं अधिक व्हायरस, संशोधनातून नवी माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More