बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवऱ्याने ‌व्हाॅटसअॅपला तिचा डीपी न ठेवल्याने पत्नीने केलं असं काही की….

पुणे | पती पत्नी म्हटलं की त्यांच्यात लहान-सहान वाद आलेच पण व्हाॅटसअॅपमूळे एखाद्या दांपत्यात वादाची ठिणगी पडल्याचं कदाचितचं ऐकायला येतं. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे, निमित्त फक्त व्हाॅटसअॅपचा डीपी. ‘माझ्या सगळ्या मैत्रीणींचे पती त्यांच्या व्हाॅटसअॅपच्या डीपीला त्यांच्या बायकोचे फोटो लावतात, पण माझा नवरा कधीच माझा फोटो ठेवत नाही, अशी तक्रार घेऊन एक उच्चशिक्षित महिला पोलीस ठाण्यात गेली होती. दोघांमधल्या सततच्या वादाने हे प्रकरण भरोसा सेलकडं गेलं.

सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी या प्रकारणाची माहिती दिली आहे, ‘आमच्या विभागात कौटुंबिक समस्याचं निराकरण करण्यात येतं. एक दिवस एक महिला आमच्या विभागात आली आणि तिने अर्ज केला की,’ माझा पती माझ्याकडे लक्ष देत नाही. माझे वडिल वारले आहेत. माझी आई आणि लहाण बहिण माझ्या माहेरीच राहतात पण त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. मी आणि माझा नवरा एकमेकांशी बोलून जमेल तसं माझ्या आईला मदत करत असतो. त्या दोघीही आम्हाला अडचणीच्यावेळी मदत करत असतात. आमच्या नवरा बायकोत चांगला संवाद होतो. मला त्याकडून काही त्रास होत नाही आणि तो कोणताही त्रास देत नाही’. तिने सगळं सांगितल्यानंतर विचारलं मग तू अर्ज का केला? त्यावर ती म्हणाला ‘माझा पती व्हाॅटसअॅप माझा फोटो ठेवत नाही’. म्हणून मी त्याच्यावर नाराज आहे.

त्यानंतर पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी तिच्या पतीकडे विचारणा केली असता तो म्हणाला, ‘मी माझ्या बायकोची काळजी घेतो, तिला जपतो. माझ्या मेहुणीच्या शिक्षणाचा खर्च उचलतो, सासूबाईंना आधार देतो. वयोमानानुसार त्यांची काही दुखणी असतील तर दवाखन्यात घेऊन जातो. तरी ही माझ्याशी तिचा डीपी माझ्या व्हाॅटसअॅपला का ठेवला नाही म्हणू्न रागराग करत असते. यावरून आमच्यात कायम वाद होतात, यावर मी काय करावं हेच मला कळत नाही, असं त्यानं सांगितलं

दरम्यान, भरोसा सेलने सदर महिलेचं समुपदेशन केलं. ‘तुझा नवरा तुझी काळजी घेतो. तुझ्या घरच्यांची काळजी घेतो. याचा अर्थ त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग व्हाॅटसअॅपला तुजा डीपी नाही ठेवला तर त्याने काही फरक पडणार आहे का?’ त्यावर ती नाही म्हणाली. तेव्हा सुजाता शानमे यांनी सांगितलं, प्रेम हे दाखवण्यासाठी नसतं तर ते आपल्या कृतीतून व्यक्त करायचं असतं. त्यानंतर दोघांनाही ही गोष्ट पटली आणि यानंतर परत कधी अशा प्रकारची तक्रार करणार नाही असं सांगत दोघेही समाधानाने घरी गेले, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दिली.

थोडक्यात बातम्या

‘जिल्हा परिषदांमधील आरक्षणाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये म्हणून…’; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

नोकरीची सुवर्णसंधी; RBI मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती सुरू

‘ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है…’; राखीने शेअर केला बाथरूममधील व्हिडीओ

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More