बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका!

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशमुख यांनी केली होती.

अनिल देशमुखांची ती याचिका फेटाळली आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय द्वेषाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याचं अनिल देशमुख यांनी याचिकेमध्ये म्हटलं होतं.

अनिल देशमुखांसह राज्य सरकारचीही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या आणि सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत तो भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने  हीसुद्धा याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती संदिप शिंदे आणि न्यायमुर्ती एन. जे. जामदार यांनी ही याचिका फेटाळली आहे. देशमुखांसाठी याचिका फेटाळणं मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

पॉर्न प्रकरणात मोठी बातमी! राज कुंद्राने क्राईम ब्रांचला दिली इतक्या लाखांची लाच???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More