बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

मुंबई | सर्वजण रात्री झोपेत असताना मुंबईत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. 15 मार्च आणि 16 मार्चला रात्री मुंबईत मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या बैठका घेतल्या होत्या. तर सत्ताधारी पक्षांनी दिवसा पक्षांतर्गत बैठकांचा धडाका लावला होता. या सर्व बैठकांमधून मुंबई पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. ज्या मावळत्या पोलीस आयुक्तांची बदली झाली आहे, त्यांनी नवनियुक्त आयुक्तांना पदभार सुपूर्त करायचा असतो, अशी आतापर्यंतची प्रथा होती. पण जेव्हा परमबीर सिंग यांना त्याच्या बदलीची महिती कळली, तेव्हा ते सरळ आयुक्तालयातून पदभार सोडून निघून गेले. त्यानंतर नवनियुक्त आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्तालयात जाऊन त्यांचा पदभार हाती घेतला. अशी घटना मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे.

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीसांची बदनामी केली गेली. तर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 15 मार्चच्या रात्री विश्वास नांगरे पाटील आणि मिंलिद भारंबे या दोन पोलिस आधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तर 16 मार्चच्या रात्री परमबीर सिंग यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरापर्यंत आणखी एक बैठक झाली आणि अखेर 17 मार्चला परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली.

दरम्यान, परमबीर सिंग हे त्यांच्या बदलीमुळे नाराज असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे रजनीश शेठ लाचलुचपत, विवेक फणसाळकर या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ शकते अशी चर्चा होती. परंतू हेमंत नगराळे यांची थेट मुंबई पोलीस आयुक्तपदावर वर्णी लागल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

‘शार्ली हेब्दो’चं आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र, वाचा काय आहे प्रकरण

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘तुम्ही प्रचार करू नका’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं शरद पवारांना पत्र

विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात पुणे विद्यापीठाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More