बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेवटी प्रेम ते प्रेमच! पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात पतीनेही सोडले प्राण

जळगाव | प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट समजली जाते. प्रेमाला वयाचं, काळाचं आणि रंगाचं बंधन नसतं. नवरा बायकोचं नात सुद्धा असंच घट्ट असतं. अशीच एक घटना जळगावमध्ये घडली आहे. एका वृद्ध दामपत्याने एका पाठोपाठ एक जीव सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आसपासच्या परिसरात हळहळ वक्त केली जात आहे.

धरणगाव तालुक्यातील रोटवदमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आपल्या पतीला सोडून कधीही न राहिलेल्या लताबाई झुंझारराव  या त्यांच्या नवऱ्यासोबत शेतात गेल्या होत्या. हे दोघेही शेतीवर उदारनिर्वाह करून आपलं आयुष्य जगत होते. पती नारायण झुंझारराव यांच्यासोबत त्यांनी जेवण केलं. त्यानंतर लताबाई झोपायला गेल्या होत्या.

नारायण बाहेर जाऊन आल्यावर त्यांनी लताबाईंना उठवल्याच्या प्रयत्न केला तेव्हा त्या वारल्याचं त्यांना समजलं. त्यांनी त्यांच्या पुतण्याला फोन करून ही माहिती दिली आणि त्यानंतर अर्ध्या तासातच पती नारायण यांने सुद्धा आपले प्राण सोडले. दुखः अनावर झाल्याने त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला होता.

दरम्यान, लताबाई आणि नारायण यांच एकमेकावर खूप प्रेम होतं, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. तर या दोघांच्या अकाली मृत्यूने त्याच्या परिवाला मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग!

‘ज्या अभिनेत्रीच्या हातावर मी थुंकतो ती…’ ; अमिर खानचा व्हिडीओ व्हायरल

“शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे हे तपासण्याची गरज”

“ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर उभं आहे, हे लक्षात असू द्या”

बाप रे बाप! टीम इंडियाचा जबरा फॅन, वनडे सामना पाहण्यासाठी चक्क ‘या ठिकाणी’ जाऊन बसला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More