बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील ‘या’ 6 शहरांमध्ये रंगणार आयपीएलचा थरार

मुंबई | महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संख्येनंतरही वानखेडे स्टेडियमवर सामन्यांसाठी परवानगी दिली आहे. मात्र, वानखेडे स्टेडियमवर सामना प्रेक्षकांविना होणार आहे. आयपीएलचा 14 हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु होणार असून 11 एप्रिलपासून या थराराला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे.

यावर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने 6 शहरांची निवड केली आहे. यावेळी, आयपीएलचे सामने मुंबई, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली येथे सामन्यांचे आयोजन होणार आहे. मुंबईत मात्र प्रेक्षकांविना सामन्याच आयोजन होणार आहे. या वेळी राजस्थान राॅयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे 3 संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळू शकणार नाहीत.

स्थानिक क्रिकेटमुळे हैदराबादला होस्टींग शहरांमध्ये स्थान देण्यात आले नाही आणि अखेर दिल्लीला यजमान शहरांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. प्रेक्षकांना काही राज्यांमध्ये सामनादरम्यान परवानगी दिली जाणार नाहीये. तर काही राज्यात स्टेडियमच्या क्षमतेनुसार 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड दरम्यानचे एकदिवसीय सामने देखील पुण्यात होणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ‘गहूंजे’ स्टेडियमवर भारत-इंग्लंड दरम्यान खेळले जाणार आहेत. सामने खेळविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे प्रेक्षकांना हा थरार अनुभवता येणार नाही. प्रेक्षकांविनाच हे सामने खेळविले जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या –

दम लगा के हैशा! मेरोलिनच्या पुशअप्स चॅलेंजवर राहुल गांधींचा दस का दम, पाहा व्हिडीओ

‘पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी घेतले’; शांता राठोडांच्या आरोपावर लहू चव्हाणांनी सोडलं मौन, म्हणाले..

‘जुनं ते सोनं’! इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीतूनच केली नवरा-नवरीची पाठवणी!

संजय राठोडांनी आधीच राजीनामा दिला असता तर…- पंकजा मुंडे

धक्कादायक! अनैतिक संबंधात आणू शकतो अडथळा म्हणून केली पतीचीच हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More