बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाईकवर स्टंट करताना दोघे आपटले, बघणाऱ्याच्या अंगावर येईल काटा; पाहा व्हिडीओ

मुंबई | अलिकडची तरुण पिढी सतत बाईक रायडिंग आणि त्यादरम्यान स्टंट करण्याकडे खेचली गेलेली आहे. मात्र या स्टंट्समुळे अनेक अपघात होताना दिसतात, अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच एक स्टंटचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ आयपीएस ऑफिसर दिपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्वीटरवर शेअर केला आहे. शेअर करताच हा व्हीडिओ हजारो लोक फाॅरवर्ड करत असून सोशल मीडियावर व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हीडिओमध्ये दोन मुलं गाडीवर स्टंट करताना दिसत आहेत. मात्र त्याचदरम्यान दोघेही गाडीवरुन जोरात पडल्याचं देखील दिसत आहे. या स्टंटमध्ये एक मुलगा वेगाने गाडी चालवत आहे तर दुसरा मुलगा मागे हात हवेत सोडत असतानाच त्याचा पाय घसरुन तो जोरात खाली पडतो.

पहिला मुलगा पाय घसरुन खाली पडताच गाडी काही अंतरावर पुढे गेली. मात्र लगेचच दुसरा मुलगा देखील रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. या व्हीडिओवरुन दोघाही मुलांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असल्याचा अंदाज लावता येतो.

दरम्यान, या व्हीडिओवर १० हजार पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हीडिओ शेअर करत असताना ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा, इसे मुर्खता मे ना गवाना’, असं कॅप्शन काबरा यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कुख्यात गुंड गजा मारणेला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद; पाहा CCTV फुटेज

पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांना मोठा धक्का; 2 कुख्यात टोळ्यांमधील ‘या’ 13 जणांवर मोक्का!

…म्हणून या माणसाने चक्क कांगारुच्या कानाखाली वाजवली, कांगारुही हैराण, पाहा व्हिडीओ

धक्कादायक!; अवघ्या चार ते पाच हजार रुपयात कोरोनाच्या बनावट अहवालाची विक्री

रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवणं आता आणखी महाग; 50 रुपये मोजावे लागणार!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More