प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना? – चित्रा वाघ
मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन असं स्कॉर्पिओ मालकाचं नाव आहे. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. याचदरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रिटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य आणि रहस्यातून बाहेर पडत आहेत अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना? अशा आशयाचं ‘ट्विट’ करत चित्रा वाघ यांनी विरोधकांना सवाल केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या गाडीचा शोध पोलिसांनी लावला. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना देखील सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.
दरम्यान, जेव्हा जेव्हा पोलिसांचे फोन यायचे तेव्हा ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करुचं शकत नाहीत. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचे आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी दिली.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले
कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी
आणि
आता मनसुख हिरेन…
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य…..
आणि
रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणार्या गोष्टी…….सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 5, 2021
थोडक्यात बातम्या –
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
बाबो! रिषभ पंतने जेम्स अँडरसनला मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का, पाहा व्हिडीओ
44 किलो गांजा जप्त, आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार
कौतुकास्पद! रूग्णांना त्वरित रक्त मिळण्यासाठी अभिनेता सोनू सूदनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल
‘चोर ज्यांना घाबरतात त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात’; कंगणाचं तापसी आणि अनुरागवर टीकास्त्र
Comments are closed.