बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ‘ही’ 3 मंदिरे बंद; प्रवेशद्वारातूनही मिळणार नाही दर्शन

उस्मानाबाद | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाळी महाराष्ट्राच्या तुळजाभवानीचे मंदीर बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात लोक फक्त प्रवेशद्वार आणि कळसाचं दर्शन घेण्यासाठी तिथं जमा होतात. तसेच त्यानंतर तुळजाभवानी लगत असलेल्या इतर तीन उपदेवतांच्या मंदीरात दर्शनासाठी जातात. मात्र आता ही मंदीरे देखील बंद करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संबंधित जागी जाऊन पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक तुळजाभवनीच्या उपदेवतांच्या मंदिरात गर्दी करत होते. यानंतर तहसिलदार सौदागर तांदळे यांनी या तिन्ही मंदिरांना सील केलं आहे. यामध्ये अन्नपुर्णा देवी, टोळ भैरव आणि मातंगी देवी मंदिरांचा समावेश आहे.

तुळजाभवानीच्या उपदेवातांची मंदिरे जरी सील करण्यात आलं असली तरी त्यांचे दैनंदिन विधी करण्यासाठी प्रशासनाने रजिस्टर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे पुजारी मंदिरात जाताना नोंद करु शकतील. तसेच यामुळे कोणाचीही धार्मीक भावना दुखावली जाणार नाही. यावेळी पुजाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आव्हान सौदागर तांदळे यांनी केले आहे.

दररम्यान, हिंदू धर्मीय बरोबर इतर धर्मीय प्रार्थना आणि धार्मीक स्थळे देखील कोरोनामुळे सील करण्यात आली आहेत. तसेच भाविकांनी देखील कोरोनाचे गांभीर्य पाळून सहकार्य करावे, अशी इच्छा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! कोरोनामुक्त रुग्णाच्या मेंदुत आढळला ‘हा’ फंगस

न्यायाधीशांना धमक्यांचे फोन येतात तरीही सीबीआय, आयबीकडून मदत मिळत नाही – सर्वोच्च न्यायालय

“तापलेल्या तव्यावर स्वत:ची चपाती भाजण्याची सवय भाजपने बदलावी”

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आदर पुनावाला यांची मोठी घोषणा, म्हणाले…

“खात्यात 15 लाख आले, युवकांना नोकऱ्या मिळाल्या, भारत विश्व गुरू बनला म्हणूनच मोदी….”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More