Top News

‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’; जया बच्चन यांचा रवि किशन यांना अप्रत्यक्ष टोला

नवी दिल्ली | बॉलिवूड इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं काही लोक काम करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केला आहे.  सभागृहात शून्य प्रहराला त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी भाजप खासदार रवि किशन यांना जोरदार टोला लगावला आहे.

रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे लज्जास्पद असल्याचं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.

केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही. ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात, असं म्हणत जया बच्चन यांनी टीका केली आहे.

दरम्यान, ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणत आहेत याला माझा विरोध राहिलं, असं म्हणत जया बच्चन यांनी अभिनेत्री कंगणा रावणातवर सुद्धा निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

काळ कठीण आहे फोन बंद ठेवू नका, 3 वाजताही कुणी फोन केला तरी उचला- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथं तसं काही होईल वाटत नाही- निलेश राणे

…नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल; कोरोनाग्रस्त ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

पुणे जिल्ह्यातील सर्व संशयितांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय

रामदास आठवले हे अर्धशटर बंद झालेलं दुकान आहे- अनिल परब

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या