बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीकरांनी भाजपच्या भ्रमाचा भोपळा फोडला- उद्धव ठाकरे

मुंबई | विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल केजरीवालांचं अभिनंदन. आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपने अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी मतदारांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा केजरीवाल यांना ते पराभूत करू शकले नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील ‘आप’च्या विजयाने अरविंद केजरीवाल यांनी जन की बात देशाला दाखवून दिली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टोला लगावला.

दरम्यान, निवडणुकीच्या मिळत असलेल्या अपडेटनुसार ‘आप’ला 63 तर भाजपला 07 आणि काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

दिल्लीत 12 मुख्यमंत्री जाऊनही भाजपचा पराभव झाला- रोहित पवार

आता भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही- शरद पवार

महत्वाच्या बातम्या-

शेवटच्या निकालात चित्र पलटणार; राम कदमांचा विश्वास

भाजप खासदार म्हणतो…केजरीवालांचा मोफत वीज देण्याचा निर्णय आवडला

अभिनेत्री तेजश्री प्रधानचं ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More