बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC चा सावळा गोंधळ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘त्या’ पत्रामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका

नवी दिल्ली | राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेवरून राज्यात मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर आता असाच गोंधळ देशभरात उडण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेपुर्वी अंतिम वर्षाचे गुणपत्रक सादर न करू शकणारे उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यासंबंधीचं पत्र आयोगाने पाठवलं आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठांना परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यापीठात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेआधी युपीएससीची पुर्वपरीक्षा घेण्यात आली होती. तर मुख्यपरीक्षांच्या अर्जासाठी 11 नोब्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरताना अंतिम वर्षाचं गुणपत्रक मिळालं नाही. त्यामुळे उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला होता.

उमेदवारांनी आयोगाला अर्ज करून गुणपत्रक भेटले नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आयोगाने बाकीच्या कागदपत्रांसह उमेदवारांचे अर्ज घेण्यास परवानगी दिली होती. उमेदवारांनी गुणपत्रक मिळाल्यानंतर स्वतंत्र अर्ज करून गुणपत्रिका दिल्या होत्या. मात्र त्यानंतर आयोगाने अपूर्ण अर्जावरून उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. पण नियमाप्रमाणे अर्ज स्विकारला जाऊ शकत नाही, असं आयोगाचं म्हणणं आहे.

दरम्यान, या प्रकरणात आयोगाच्या सावळ्या कारभारावर उमेदवार नाराज आहेत. राज्यातील काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. तर न्यायालयाने आयोगाला या बाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

सरकारने जबरदस्तीने घरी बसवलं म्हणत IPS अधिकाऱ्याने केलं असं काही की…

“प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक कोटी रूपये, हेलीकाॅप्टर देणार आणि चंद्रावरही नेणार”

“भारतात 30 टक्के मुस्लीम एकत्र आले तर चार पाकिस्तान तयार होतील”

” भाजपमध्ये दलितांना किंमत नाही, राष्ट्रपतींनी नमस्कार केला तर मोदी त्यांची दखल घेत नाही”

धक्कादायक! फुलांसारख्या दोन लेकींसह बापाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More