मुंबई | काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईमध्ये तीन कोटी 75 लाख रूपयांचं ऑफिस खरेदी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर दिवसभरात अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. मात्र यावर मातोंडकर संतापल्या असून त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.
मी ऑफिस घेतलं हे खरं आहे. मात्र प्रसारमाध्यमांनी फक्त अर्ध सत्य छापलं. मार्च 2020 मध्ये अंधेरी डी.एन. नगर येथे असणारा माझा एक फ्लॅट मी विकला होता. या पैशातून मला खरेदी करायची होती. मात्र लॉकडाउनमुळे सर्व नियोजनावर पाणी फिरलं असल्याचं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
आता जे ऑफिस घेतलं आहे ते त्याच पैशांमधून विकत घेतलं आहे. सर्व कागदपत्रं त्याच रजिस्ट्रेशन कार्यालयात उपलब्ध असल्याचं मातोंडकर यांनी सांगितलं. मातोंडकरांनी यासंदर्भात ट्विट करत व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आतापर्यंत प्रत्येक व्यवहाराचे सर्व कागदपत्रं आणि पुरावे आहेत. मला तोडण्याचा प्रयत्न करु नका, असंही मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
With love to #GodiMedia 🙏🏼@MumbaiMirror @ABPNews @OpIndia_com pic.twitter.com/71tsbvR4wR
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 3, 2021
थोडक्यात बातम्या-
“ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”
“मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?”
‘पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा’; संभाजी ब्रिगेडची मागणी
“लस टोचणं हे स्किल, मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल”
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास आरपीआयचा विरोध- रामदास आठवले