बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेर की झलक सबसे अलग! युवी पाजी तुस्सी ग्रेट हो, 4 चेंडूत 4 सिक्सर, पाहा व्हिडीओ

मुंबई | भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये त्याला ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखलं जातं. याच सिक्सर किंगने एका सामन्यात चार चेंडूत चार षटकार टोलवत मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज मध्ये इंडिया लिजेंड विरुद्ध आफ्रिका लिजेंड यांच्यातील सामन्यात युवराज सिंगने चार चेंडूत चार षटकार मारले. सामन्याची 18 वा षटक आफ्रिकेच्या डी ब्रूयनने टाकलं. या षटकात युवराजने डी ब्रूयनला चार षटकार ठोकले. यावेळी क्रिकेट चाहत्यांना  सहा चेंडूत सहा षटकार लावणारा तो जुना युवराज सिंग आठवला.

दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचव्या चेंडूवर युवराजनं लॉग ऑफवर सलग चार चेंडूवर हे षटकार मारले. संपूर्ण सामन्यात युवराजने 22 चेंडूत फटकेबाजी करत 52 धावांची आवश्यक खेळी केली. तर याच सामन्यात इंडिया लिजेंड संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरने देखील 60 धावा करून भारताला चांगली सुरवात करून दिली होती. तर आफ्रिका लिजेंड समोर 205 धावांचं लक्ष्य दिलं होतं.

दरम्यान, सध्या रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज चालू आहे. 6 देशांच्या टीम या सिरीज मध्ये सहभागी आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेले खेळाडू या सिरीज मध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, जॉनटी रोड्स, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा, केविन पीटरसन यांसारखे लिजेंड खेळत आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“केवळ भाजप असा पक्ष आहे जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो”

गाण्यावर जखमी जेनेलिया, रितेश देशमूख आणि मित्रांनी केला अफलातून ‘डान्स’, पाहा व्हिडिओ

फक्त भाजप सत्तेत येऊ नये त्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील

‘या’ घोडचुकीने पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं झालं निलंबन

राज्य सरकार भ्रष्टाचाराचा आरसा बनला आहे- विखे पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More