मुंबई | मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील फोन कॉलबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी नांगरे पाटलांना 31 डिसेंबरला फोन करत नव्या वर्षाची सुरूवात केली. याबाबत पाटलांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.
मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो, असं उद्धव ठाकरे बोलले असल्याचं नांगरे-पाटलांनी सांगितलं.
आम्ही चोरांकडून परत मिळवलेली 25 मंगळसूत्रे त्या-त्या भगिनींना देऊ केल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले असल्याचं नांगरे पाटलांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी राज्याच्या प्रमुखांची अशी भेट दिलासादायक आणि एकंदरीत वर्षाची सुरुवात उमेद वाढवणारी ठरली असं नांगरे पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“थोरातांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कळणार नाही”
औरंगाबादच्या नामंतरावरून ठाकरे सरकारमधील विरोधाभासावर अजित पवाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
“औरंगाबादच्या नामांतराच्या वादातून ठाकरे सरकार कोसळणार”
‘मी ‘त्या’ पैशातून तीन कोटी 75 लाखांचं नवीन कार्यालय विकत घेतलं’; मातोंडकरांनी केला खुलासा