बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इयरबर्ड्स घालून गाणी ऐकताना अचानक झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू

जयपूर | राजस्थानमधील जयपूर येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. इयरबर्ड्स घालून गाणी ऐकत असताना अचानक स्फोट झाला. यावेळी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाचं नाव राकेश नागर असं आहे.

राकेश याचा या वर्षाच्या फेब्रूवारीमध्ये विवाह झाला होता. तसेच तो स्पर्धा परिक्षेची देखील तयारी करत होता. मात्र इयरबर्ड्स कानात घालून गाणी ऐकणं त्याच्या जिवावर बेतलं आहे. राकेश हा 28 वर्षांचा होता. इयरबर्ड्स लावून गाणी ऐकताना इयरबर्ड्सना चार्जिंगला लावण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचा स्फोट झाला.

गाणी ऐकत आसताना अचानक इयरबर्ड्सचा स्फोट झाला आणि राकेश चक्कर येऊन खाली पडला. यावेळी त्याच्या कानातून रक्त येत होतं. हे पाहून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यादरम्यान स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज आला होता. यात राकेशचा मृत्यू कार्डियो अरेस्टमुळे झाला आसल्याचा आंदाज डाॅक्टरांनी लावला आहे.

दरम्यान, सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात हेडफोन्स तसेच इयरबर्ड्सचा वापर करते. हेडफोनपेक्षाही इयरबर्ड्स वापरायला सोपं असून त्याला वायरचा त्रास नसतो. मात्र त्यासाठी चार्जिंगची गरज असल्याने त्याचं चार्जिंग संपलं तरी कानात घालून चार्जिंगला लावतात. मात्र असं करणं जिवावर बेतू शकतं.

थोडक्यात बातम्या-

तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय, ते…- छगन भुजबळ

“मोदी सरकारला त्यांच्या विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून 7 वर्षांपासून पदे रिक्त आहेत”

भररस्त्यात महिलेने कारचालकाला केली बॅटने मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

खुशखबर! आता मोफत गॅस कनेक्शन मिळणार, वाचा काय आहेत नियम?

‘न्यूड सीन दिले नाही म्हणून माझं करिअर संपलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More