मुंबई | महाराष्ट्र सरकारकडे सुशांत सिंह प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडे असताना रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधील ड्रग्जबाबत चाट उपलब्ध असताना त्यांनी का दुलर्क्ष केलं, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
सुशांत प्रकरण जवळ जवळ 65 दिवस महाराष्ट्रकडे होतं. तेव्हा कोणालाच का नाही अटक करण्यात आली. राज्य सरकारने ड्रग्ज संबंधातील मुद्दा जाणूनबाजून सोडला का?, असंही राम कदम यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने गंभीर व्हटसअॅप चाट एवढी महत्त्वाची गोष्ट का लपवून ठेवली?, असं कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.
#सुशांतसिंगराजपूतच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारकडे या प्रकरणाचा तपास 65दिवस होता या कालखंडामध्ये ड्रगच्या संदर्भातील गंभीर व्हटस अप चाट उपलब्ध असताना देखील असे कोणते कारण होते की महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले ?एवढी महत्त्वाची गोष्ट @CMOMaharashtra दडवून का ठेवली ? pic.twitter.com/zChVLkOBWe
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) October 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘योगी आदित्यनाथ यांचीच नार्को टेस्ट करावी’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर
“योगी जी, प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा”
‘प्रियंका, तुझी काळजी वाटते पण…’; रॉबर्ट वाड्रा यांचं भावूक ट्विट