बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झोमॅटो वाद प्रकरणात आला मोठा ट्विस्ट; डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणारी महिला फरार

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी हितेशा चंद्राणी महिलेनं झोमॅटोवरून जेवण मागवलं होतं. मात्र ऑर्डर येण्यास उशिर झाल्यामुळे तिने मागवलेलं जेवण कॅन्सल केलं. या गोष्टीचा राग आल्यानं डिलिव्हरी बाॅय कामराजने तिला मारलं आणि यात तिला नाकाला जबर मार लागला असा दावा एका व्हिडिओद्वारे हितेशा चंद्राणी या महिलेनं केलं हाेता. तर आता या प्रकणात मोठा ट्विस्ट समोर येत आहे.

हितेशा चंद्राणी हिनं डिलिव्हरी बॉयच्या विरोधात एफआयआर देखील केली होती. त्यानंतर कामराजची चूक नसून हितेशाची चूक होती, असा खुलासा नुकताच झाला होता. त्यानंतर आरोप करणारी हितेशा फरार असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी तिला रितसर नोटीस देखील पाठवली होती.

आपण बंगळूरू सोडून महाराष्ट्रात मावशीकडे आली आहे, असं हितेशाने नंतर पोलिसांना कळवलं आहे. तिचं म्हणणं मांडण्यासाठी पोलिसांनी तिला वेळही दिला आहे. जर ती बंगळूरला आली नाही तर आम्ही तिला अटक करू, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तिचं म्हणणं जोपर्यंत नोंदवून घेत नाही तो पर्यंत तपास चालूच राहीलं, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हितेशा चंद्राणी यांच्यावर आता डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कामराज या डिलिव्हरी करणाऱ्या मुलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार शिवीगाळ करून मारहाण करणे आणि खोटी तक्रार दाखल करणं हे आरोप हितेशावर करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“शाळेत डान्सबार, लॉज आणि मद्यविक्रीची परवानगी द्या”

‘लोकसभा निवडणुकीवेळी मला…’; कंगणा राणावतचा मोठा खुलासा

संतापजनक! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार!

कोरोनामुळे ‘या’ राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; बससेवा केली बंद

मुंबईकरांनी भारतीय संघाला सावरलं, अटीतटीच्या सामन्यात भारताचा इग्लंडवर विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More