Top News महाराष्ट्र मुंबई

आगे आगे देखो होता है क्या- प्रसाद लाड

मुंबई | ग्रामपंचायत निवडणूकीनंतर आता राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं वारं घुमू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कृष्णकुंजवर पाऊण तास चर्चा केली.

या भेटीनंतर  मनसेशी भाजप युती करणार का? असा सवाल लाड यांना पत्रकारांनी विचारला असता, त्यावर ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी प्रतिक्रिया देतं, आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिले.

महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. राज ठाकरेंशी माझा कौटुंबिक स्नेह आहे. आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं लाड यांनी प्रसाद माध्यमांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान,  शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु, असं म्हणत लाड यांनी शिवसेनेला इशारा दिला.

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला- सुशीलकुमार शिंदे

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते”

सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली?- ब्राह्मण महासंघ

भाजपला धक्का! 11 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती धरलं धनुष्य

जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या