धुळे | अयोध्योतील राम मंदिराच्या वर्गणीला आता सुरूवात झाली आहे. राज्यात निधी संकलन मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
धुळ्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली.
दरम्यान, माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, असा टोलाही त्यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असं दानवे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
एक मुलगा अन् दोन तरूणी, भररस्त्यात सुरू होती हाणामारी; व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
“माझं नाव सत्तार, मी सत्तेतच राहणार”
राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे “बाजारात तुरी” मी भाजपमध्येच समाधानी- बापू पठारे
राज्याचं नेतृत्व दिलं, पक्षाची धुरा दिली, तरीही सोडून गेले- शरद पवार
शेतकरी कुठलाही असो त्यांना सन्मानाची वागणूक द्या- रोहित पवार