Top News महाराष्ट्र मुंबई

मास्क है जरुरी!; आदित्य ठाकरेंनी ‘मास्क’ म्हणताच सेना आमदाराची उडाली त्रेधातिरपीट!

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यभर कुठेही फिरताना मास्क लावणं बंधनकारक केलं आहे. या नियमाचं काही नागिरांकडून उल्लंघन होताना दिसतं. मात्र पण याला नागरिकच काही नाही तर राजकारणीसुद्धा मास्क न लावता फिरताना दिसतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मास्क लावणं किती गरजेचं आहे हे सांगत असतात. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले सेना आमदार प्रकाश प्रकाश सुर्वे यांच्या तोंडाला मास्क नसतं.

आदित्य ठाकरेंचं बोलणं चालू असताना सुर्वे यांच्या लक्षात येतं की आपण मास्क लावलेलं नाही. तेव्हा त्यांची मास्क लावण्यासाठीची लगबग कॅमेराच कैद झाली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल माध्यामांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरेही हसत होते. सुर्वेंना सुद्धा आपला हसण्याचा मोह आवरता आला नाही.

 

थोडक्यात बातम्या-

‘तुमच्या शक्तीचा उपयोग करुन मुलाचं मन वळवा’; शेतकऱ्याचं मोदींच्या आईला पत्र

“तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील, त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे”

ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हत पाहिजे- संजय राऊत

“ज्यांच्याबरोबर लढायचं त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या