बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक, पालकमंत्र्यांनी केली घोषणा 

अहमदनर | महाराष्ट्रातील लॉकडाऊन पाच टप्प्यात अनलॉक होणार आहे. 7 जून म्हणजेच येत्या सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. शासनाच्या नियमानुसार अहमदनगर जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनलॉकबाबत घोषणा केली आहे.

अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4.30% इतका आहे. राज्याच्या निकषानुसार हा रेट 5% पेक्षा कमी असल्याने अहमदनगर जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असून सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक होणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतान मुश्रीफ यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली.

शिवस्वराज्य दिनानिमित्त सरकारी कार्यालयांवर भगवा झेंडा फडकवण्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याला विरोध केला. मात्र सदावर्ते यांना नेमकी अडचण काय आहे?, असा सवालही मुश्रीफांनी  यांनी केला. आरक्षण देण्याबाबत राज्याला अधिकार राहिलेला नसून सुप्रीम कोर्टाचा निकाल स्पष्ट असल्याचं मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 15 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल.

थोडक्यात बातम्या- 

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचं सरकार येईल असा विचार माझ्याही मनात कधी आला नव्हता”

प्रत्येक महाविद्यालयात साजरा होणार शिवस्वराज्य दिन; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

‘ही’ असू शकते भारतातील सर्वात स्वस्त लस, जाणून घ्या किंमत!

“संघाला कोरोनापेक्षा नरेंद्र मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता”

टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी ‘हा’ देश आला पुढे; बीसीसीआय पुढे नवं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More