पुणे | आपलं रोखठोक बोलणं, तापट स्वभाव आणि झटकीपट निर्णय घेण्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ओळखले जातात. अजित पवार केव्हा कोणावर भडकतील काही सांगता येत नाही. असाच एक किस्सा घडला आहे.
गुंठेवारीचा विषय मंजूर केल्यानं काही गावकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आले होते. अजितदादांना त्यांचा सत्कार करायचा होता. यावर अंकुश काकडे यांनी दादांची वाट वळवण्याचा प्रयत्न केला. काकडेंनी पवारांना फक्त 5 मिनिटं सत्काराला द्या, तेवढ्यासाठी ते थांबलेत, असं म्हणत होते.
काकडेंच्या विनंतीनंतर अजित दादा संतापले आणि म्हणाले की, काम करू की सत्कार स्वीकारू, केलं ना तुमचं काम, आता सत्कार कशाला, यामुळेच तुम्ही मागे राहता, असं अजित पवार म्हणाले. पुण्यात कौन्सिल हॉल येथे बैठकीसाठी अजित पवार आले होते तेव्हा हा प्रकार घडला.
दरम्यान, अजित पवार तापट असले तरी ते म्हणतात की, अजित दादा ज्यांना अधिक जवळचे मानतात किंवा जे दादांच्या अधिक जवळ आहेत त्यांच्यावरच दादा जास्तच जास्त वेळेस रागावतात.
थोडक्यात बातम्या-
चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट- अजित पवार
“कोरोनाची पहिली लस पंतप्रधान मोदींनी घ्यावी, मग आम्ही घेऊ”
KGF 2 चा टीझर वेळेच्या आधीच रिलीज; रचला नवा रेकाॅर्ड, पाहा व्हिडीओ
लॉजवर पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागला; तरुणाचा जागीच मृत्यू!
“सरकारी ट्विटर हॅंडलवर सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?”