Top News महाराष्ट्र मुंबई

‘आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचंय त्यामुळे…’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना

मुंबई | राज्यात काही महिन्यावर स्थानिक पातळीवरील निवडणुका आल्या आहेत. सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचीतील तिन्ही पक्ष एकत्र निवडणुक लढवणार की स्वबळाचा नारा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना यासंदर्भात आदेश दिला आहे.

आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचं आहे. महाविकास आघाडी‌ अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचं आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, असं अजित पवार म्हणाले.

मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे  राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी बोलताना अजित पवारांनी आदेश दिले.

दरम्यान,  या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

‘मी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर…’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात देखील नाईट कर्फ्यूची घोषणा!

“ज्यांच्या राजकारणाचं दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभं आहे त्यांनी संघराज्य, लोकशाहीवर न बोललेलं बर”

शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव- शरद पवार

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मोठा झटका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या