बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपच्या ‘या’ नेत्याने फडणवीसांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं”

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिकिया दिली होती.

प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला आहे. याबाबत प्रताप सरनाईकच नाही तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. बावनकुळेंना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बावनकुळे यांनी प्रताप सरनाईक आणि महाविकास आघाडी सरकारच्याबाबत बोलण्यापेक्षा विधानसभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं . प्रताप सरनाईक यांचं लेटर अनेक अंगानी भाजपलाच डिवचणारं असुन भाजपच्या राजकीय दहशत वादाचं दर्शन घडवणारं आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, अमोल मिटकरींच्या या टीकेला बावनकुळेंनीही प्रत्युत्तर देताना मिटकरींवर निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. मी रेडिमेड आमदार नाही. मी कार्यकर्ता असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

कौतुकास्पद! मुलीला पाठीवर घेऊन नदी ओलांडणाऱ्या महिला नर्सचा फोटो व्हायरल

वाह शमी वाह! मोहम्मद शमीने वॉटलिंगच्या उडवल्या दांड्या; पाहा व्हिडीओ

धक्कादायक! मुंबईत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रूग्णाचे डोळे उंदराने कुरतडले

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर बाहेर पडा पण…’; आरोग्य मंत्रालयाने दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, नार्वेकर म्हणाले, ‘यांना गाडीत टाका शिवबंधंन बांधू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More