Top News महाराष्ट्र सांगली

‘तु बोलतो किती, तुझी औकात किती….’; अमोल मिटकरींची पडळकरांवर बोचरी टीका

सांगली | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शाब्दिक चकमक आणखीन वाढत चालली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनधिकृत अनावरण केल्याने पडळकरांवर जोरदार टीका झाली होती. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जेजुरीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण झालं. यावेळी पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून पडळकरांनी पवारांवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली आहे.

कोणी जयंत पाटलांवर बोलायला लागलं. तु बोलतो किती, तुझी औकात किती, तु आहेस केवढा?, मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे असं म्हणत मिटकरांनी गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली.

मी मागज फाट्यावर दारू विकली नाही की कोणत्या आजीची दोन कोटींची जमीन बळकवली नाही, असं म्हणत मिटकरींनी शाब्दिक फटकेबाजी केली. मोहनराव शिंदे साखर करखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचं शिवचरित्र्य व्याख्यान म्हैसाळ येथे आयोजित केलं होतं.  त्यावेळी बोलताना त्यांनी पडळकरांवर नाव न घेता टीका केली.

दरम्यान, आम्हाला ज्यांनी आमदार केलं आहे ते आमचे गुरुही काही कमी नाहीत. विरोधासाठी विरोध नाही करायचा. शांत बसायचं. पण टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम वाजवायचा, असंही मिटकरी म्हणाले. यावेळी मिटकरींनी येत्या 19 फेब्रुवारीला शिवजंयती साजरी करण्याचं आव्हान केलं.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोडांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

“आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवरून टिव टिव करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

गृहिणींचं बजेट कोलमडलं… सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

भारतातील ‘ही’ आहे सर्वात सुरक्षित कार… वाचा सविस्तर

गजानन मारणे जेलमधून सुटलाच कसा- देवेंद्र फडणवीस

पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, कारण ऐकूण तुमचीही झोप उडेल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या