अनिल देशमुख यांनी आता स्पष्टीकरण नाही तर राजीनामा द्यावा- देवेंद्र फडणवीस
मुंबई | सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपली उचलबांगडी झाल्यानंतर दोन- तीन दिवसांनंतर त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रूपये जमा करायला सांगितलं असल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. मात्र यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर आरोप केले आहेत.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनांमधून 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी पत्रातून केला असल्याची माहिती समजत आहे. तर पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा देशमुख उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले असल्याचा आरोपही सिंह यांंनी पत्रातून केला आहे.
थोडक्यात बातम्या-
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी- अमृता फडणवीस
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामध्ये घेतलं शरद पवारांचं नाव; म्हणाले…
लाँच झालेल्या मेड इन इंडिया काॅम्पॅक्ट एसयूव्ही Skoda Kushaqचे जाणून घ्या फिचर्स
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.