बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘स्वामी…स्वामी..स्वामी…’म्हणत अंकिता लोखंडेने घेतली कोरोनाची लस, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. 1 मेपासून देशातील राज्यांमध्ये लसीकरण चालू झालं आहे. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लस घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती एका लहान बाळाप्रमाणे इंजेक्शनला घाबरत असल्याचं दिसत आहे.

अंकिता लोखंडे प्रचंड घाबरलेली दिसत असून नर्सही तिचं लक्ष दुसरीकडं जावं यासाठी काही बोलत असल्याचं पाहायला मिळते. अशात अंकिताने स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायला सुरुवात करते आणि एकदाची लस घेवून मोकळी होते. लस घेतल्यानंतर मात्र अंकिताच्या जीवात जीव आला आणि ती हसायला लागते असं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

लस घेताना अंकिताच्या आईने तिला धीर दिला मात्र इंजेक्शन पाहून अंकिताची अवस्था पाहण्यासारखी झाली होती. अंकिताचा हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहेे. अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सक्रीय अलते. अनेकदा ती ट्रोल झालेली पाहायला मिळते. त्यामुळे ती कोणत्या ना कारणाने नेहमीत चर्चेत असलेली पाहायला मिळते. मात्र आता तिचा लस घेतानाच्या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या रिलेशनशीपला नुकतेच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ते दोघे लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची माहिती आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

थोडक्यात बातम्या-  

भारतात लसीचा साठा कमी असताना इतर देशांना पुरवठा कशासाठी?, परराष्ट्र मंत्री म्हणाले…

पुण्यात एका पाठोपाठ एक गुन्हा! बदला घेण्यासाठी रचला फिल्मी कट, पेटवली कार

‘आम्हाला नियुक्त्या द्या, आता आम्ही हताश झालोय’; MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पत्र व्हायरल

“कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नरेंद्र मोदी अपयशी आणि हतबल”

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करतोय- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More