Top News महाराष्ट्र मुंबई

‘…म्हणून शिवसेनेने नामांतराचा ‘सामना’ सुरू केला’; बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेवर पलटवार  

मुंबई | औरंगाबादचं नामांतर केल्यानं मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेसचा नामांतराला विरोध करत असल्याची टीका शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसवर टीका केली होती. यावर काँग्रेस बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघत असल्याचं थोरातांनी भाजपवरही निशाणा साधला.

दरम्यान, औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आरोप करत आहेत. मात्र आरोप-प्रत्यारोप करताना महाविकास आघाडीच बिघाडी येण्याचीही शक्याताही नाकारता येत नाही.

थोडक्यात बातम्या-

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार

“शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता, पण…”

“…तर मग काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?”

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

“आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय, ‘आपल्यासाठी संभाजीनगर आणि संभाजीनगरच राहणार’”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या