Top News जळगाव महाराष्ट्र

जवान पतीला फेसबुकवर ‘आयुष्यभराचं चॅलेंज’ दिलं, मात्र नियतीला ते मान्य नव्हतं!

जळगाव | एरंडोल येथील बीएसएफचे जवान राहुल पाटील यांचं पंजाब येथे ड्युटीवर असताना हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला, मात्र त्यांच्या पत्नीच्या एका पोस्टनं साऱ्यांची मनं हळहळली.

जवान राहुल पाटील हे पंजाबमधील पाकिस्तान लगत असलेल्या फंजिलका बॅार्डरवर कार्यरत होते. तेथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

ही घटना घडण्यापूर्वी राहुल पाटील यांची पत्नी ज्योती पाटील यांनी फेसबुकवरील ‘आयुष्यभराचा जोडीदार चॅलेंज’मध्ये आपल्या पतीसोबतचा एक फोटो टाकला होता. मात्र ड्युटीवर असताना काळाने घाला घातल्याने त्यांचं हे चॅलेंज अपूर्णच राहिलं.

दरम्यान, नुकताच गुरुवारी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होऊन गेला, त्यावेळी त्यांनी व्हि़डीओ कॉल करुन मुलीला शुभेच्छा दिल्या होत्या. आज त्यांच्या निधनाची बातमी येताच साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

थोडक्यात बातम्या-

‘पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी…’; विजय वडेट्टीवारांचा ठाकरेंवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहेत- जयंत पाटील

‘…तर आम्ही मंत्रालयात घुसून अशोक चव्हाणांसह मंत्र्याचे कपडे काढणार’; छावा संघटना आक्रमक

भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय- नरेंद्र मोदी

“बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या