बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांनी हात जोडणं भास्कर जाधवांना रुचलं नाही, पळत जाऊन म्हणाले…

रत्नागिरी | अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूनच्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री चिपळूण भागात आले होते. या पाहणी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दुकानदार त्यांची व्यथा मांडत होते. व्यथा ऐकत असताना उद्धव ठाकरेंचे हात जोडले गेले. त्यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांजवळ धावत गेले.

तुमचं जे नुकसान झालं आहे. त्याची काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी तेथील व्यापाऱ्यांना सरकार मदत करणार, असं आश्वासन दिलं. चिपळूनच्या बाजारपेठेतील काही दुकानदारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले आणि त्यावेळी भास्कर जाधव धावत गेले आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले, साहेब तुम्ही हात जोडू नका, अशी विनंती केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

दरम्यान, भास्कर जाधव यांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ते एका महिलेवर हात उगरताना दिसत आहेत. सोशल माीडियावर भास्कर जाधव यांना ट्रोल करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

चिपळूणमध्ये मदत मागणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांनी हात उगारला, पाहा व्हिडीओ

“मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का हे एकदा पाहावं लागेल”

मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

देशातील ‘या’ खासगीकरणाच्या मुद्यावरून डाॅ. अमोल कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More