बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या या भारतीय लस कंपनीला मोठा झटका, लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेचा नकार

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळं देशात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या कोवॅक्सिन लसीची निर्माता भारत बायोटेक कंपनीसंदर्भात निराशजनक बातमी समोर आली आहे.

भारत बायोटेकनं बनवलेल्या कोवॅक्सिन लसीच्या आतप्कालीन वापराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव अमेरिकन अन्न व औषध प्रशासनानं फेटाळला आहे. भारत बायोटेकने अमेरिकेतील भागीदार ऑक्यूझेन कंपनीच्या माध्यमातून ‘एफडीए’कडे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली होती. मात्र, आता ‘एफडीए’ने मंजुरी देण्यास नकार दिला आहे.

‘एफडीए’ कोव्हॅक्सिन लसीचे आणखी एकदा परीक्षण करण्यास सांगितले आहे. आता यानंतर अमेरिकेकडे पूर्ण वापरासाठी मंजुरी मागितली जाईल, असे ऑक्युझेनकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ओक्यूजेननं दिलेल्या माहितीनुसार यामुळे कोवॅक्सिन लस अमेरिकेत लाँच करण्यास वेळ लागू शकतो. एफडीएशी झालेल्या चर्चेनुसार ओक्यूजेनला कोवॅक्सिन लसीच्या अतिरिक्त क्लिनिकल ट्रायल कराव्या लागणार आहेत. ओक्यूजेनचे सीईओ शंकर मुसुनुरी यांनी सांगतिलं की, एफडीएनं बीएलए लायसन्ससाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

बाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल

अनोखा निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर ‘या’ ठिकाणी केलं जाणार मोबाईलचे सीमकार्ड ब्लाॅक

“लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये”

धक्कादायक! कोरोनाकाळात ऑनलाईन फ्रॉडची वेगानं वाढ; देशाचं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

गप्पा मारण्याच्या नादात नर्सनं एका व्यक्तीलाच दिले कोरोना लसीचे दोन डोस अन्…..

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More