बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

नवी दिल्ली | सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परिक्षेंच्या निकालाबाबत आज मोठी घोषणा केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 20 जुलैला लागणार आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल 31 जुलै रोजी लागणार असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे. तसेच बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र देखील आज जाहीर केले आहे.

सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दहावीच्या परिक्षेचा निकाल 20 जुलैला तर बारावीच्या परिक्षेचा निकाल 31 जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचं आहे त्यांना काही अडचणी यायला नकोत म्हणून बोर्ड हा निर्णय घेत आहे.

तसेच बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनासाठीचा फॉर्म्युला देखील आज सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन होईल. 40:30:30 हा फॉर्म्युला कसा असेल याविषयी देखील माहिती देण्यात आली आहे.

दहावीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर 30 टक्के मार्क देण्यात येतील. यामध्ये सर्वोत्कृष्ठ गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल.  त्यानंतर 30 टक्के गुण अकरावीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित असतील. तर उरलेले 40 टक्के गुण बारावीत घेण्यात आलेल्या सर्व परिक्षांच्या गुणांवर देण्यात येतील.

थोडक्यात बातम्या – 

35 हजार लसी पडुन असल्याने ‘या’ महापालिकेचा लसीकरण सर्वांना सक्तीचं करण्याचा विचार

‘नवरा बायको भांडतात… नंतर एकत्र चहा पितात’; सेना-भाजप राड्यावर पाटलांचं सूचक वक्तव्य

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

‘यू आर दी मोस्ट ॲक्टिव्ह मेयर’ म्हणत राज्यपालांनी केलं ‘या’ महिला महापौरांचं कौतुक

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता अशाप्रकारे 4000 रुपये मिळवता येणार; वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More