Top News पुणे महाराष्ट्र

‘फडणवीस आणि पाटलांनी पक्ष प्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर दिली होती’; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट

सातार | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी असताना भाजपकडून मला 100 कोटींची ऑफर आली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. साताऱ्यात ते बोलत होते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. तसेच तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपकडून 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

मी त्यावेळेस भाजपची ऑफर नाकारली आणि भविष्यातही नाकारतच राहणार असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, शशिकांत शिंदे हे राज्यातील प्रमुख मराठा नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. राष्ट्रवादीकडून त्यांचं विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती”

प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेब आजही जिवंत आहेत- उर्मिला मातोंडकर

शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु- प्रसाद लाड

“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या