मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीला वेळ असला तरी आतापासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येताना दिसत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणार आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत माहिती समोर आली नाही मात्र प्रसाद लाड यांनी जाताना मात्र सेनेला इशारा देणारं वक्तव्य केलं आहे.
भाजपचा निर्धार, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा अशी बोलकी प्रतिक्रिया लाड यांनी दिली. त्यासोबतच राज ठाकरेंची ही माझी वैयक्तिक भेट असल्याचं लाड यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु, असं म्हणत लाड यांनी शिवसेनेला इशारा दिला.
थोडक्यात बातम्या-
“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”
“चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं आहे, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष”
महाराष्ट्रात भाजप जो काही आहे त्याचं श्रेय बाळासाहेबांना जात- संजय राऊत
“जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, रेणू शर्माची नार्को टेस्ट करा”
कोरोनाची लस घ्यायची असेल तर ही गोष्ट आत्ताच करा, नाहीतर येऊ शकते मोठी अडचण!
लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही- शरद पवार