बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यु नाही

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मात्र आता कोरोवनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे. अशातच राज्यातील या जिल्ह्यात एकाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार बुलडाणा जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण दगावला नाही. कोरोना परिस्थितीनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करून पाच स्तर बनवण्यात आले आहेत. त्यातच तिसऱ्या स्तरामध्ये असलेला बुलडाणा जिल्हा आता थेट पहिल्या स्तरामध्ये आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

बुलडाण्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सोमवारपासून बुलडाण्यातील संपूर्ण बाजारपेठ व व्यवहार सुरळीतपणे सुरू होणार आहेत. तसेच मॉल, सिनेमागृह व नाट्यगृह हे देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या जिल्हाभरात 367 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णसंख्याही कमी होताना दिसत आहे.

दरम्यान, पुण्यात सध्या 511 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,74,113 इतकी आहे. तर पुण्यात 3027 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8475 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,62,610 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5532 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-  

‘…म्हणून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल आहे ‘; पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा खुलासा

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 03 कोरोनाबाधितांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ‘ही’ बँक वार्षिक उत्पन्नाच्या चार पट पैसे व 2 वर्ष पगार कुटुंबाला देणार

‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; दिवसेंदिवस रूग्णसंख्येत होतेय घट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More