Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

“मी माझी सत्याची बाजू मांडली मात्र तरीही मला धमक्यांचे फोन येतात”

मुंबई| अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांच्यातील झालेला वाद जगजाहीर आहे. या वादानंतर प्राजक्ताने ही मालिका सोडली होती. मात्र प्राजक्तासोबतच्या झालेल्या वादानंतरही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

अलका कुबल यांनी ‘मुंबई तक’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, “मी माझ्याकडून संपूर्ण वाद संपवला आहे. इतकच नव्हे तर दोन महिन्यांचा तिचा कामाचा मोबदला तिला दिला आहे. मात्र मला अजुनही सोशल मिडीयावर ट्रोल केलं जातं, धमक्यांचे फोन येतात. मी माझी सत्याची बाजू मांडली. आता त्याहुन आधिक मी काहीच करु शकत नाही. पण तिने एवढ्या खालच्या पातळीला जायची गरज नाही.

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल या दोघी एकत्र काम करत असताना अलका कुबल यांनी प्राजक्तावर अनेक आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. मात्र अलका कुबल यांनी प्राजक्ताला उशिरा येणं, सेटवर नखरे करणं, मध्येच रडणं अशा अनेक प्रकारच्या तक्रारींमुळे मालिकेतुन काढुन टाकल्याचंही स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, अलका कुबल यांच्यासोबत झालेल्या वादानंतर प्राजक्ताने हि मालिका सोडल्यावर तिची भुमिका अभिनेत्री वीणा जगतापला देण्यात आली.

थोडक्यात बातम्या

पुण्यातील नवी पेठ परिसरातील गाजलेल्या ‘त्या’ खूनप्रकरणातील कुख्यात गजानन मारणेची निर्दोष मुक्तता

‘अभिनेत्री वॅाशरुमध्ये असताना…’; पंचतारांकित हॅाटेलमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

‘शरजील नावाच्या कारट्याला अटक होणार नसेल तर…’; नितेश राणे आक्रमक

हरामी सर्जील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे”

‘आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे’; शरजील उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या