बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपचा ‘हा’ नेता बोलायला उभा राहिला तर मुख्यमंत्र्यांना बोलताना विचार करावा लागतो”

मुंबई | विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहात झालेल्या राड्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन आणि अतुल भातखळकर या महत्त्वाच्या आमदारांचाही समावेश आहे. यावरून बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला आहे.

आपल्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे त्यांना वर्षभर काही करता येणार नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही काळ अस्वस्थता होती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार बोलायला उभे राहिले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलताना विचार करावा लागतो, अशी तोफ आहे शेलार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनात खोट नाही, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!

संसार थाटल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच ‘या’ अभिनेत्याच्या नात्यात आला दुरावा?

महिलेच्या अंगावर बसून मारहाण, पोलिसाच्या व्हायरल व्हिडीओनं देशभर संताप

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

‘राईचा पर्वत करण्याची गरज नाही’; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More