बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ख्रिस जॉर्डनने एका हातात घेतलेल्या अफलातून झेलवर सगळेच फिदा, पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘करो या मरो’ च्या स्थितीत असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-2 मालिका आपल्या खिशात घातली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये सर्वात प्रेक्षणीय ठरली ती म्हणजे विराट आणि रोहितची भागिदारी त्यासोबतच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डनने घेतलेला अप्रतिम झेल.

भारतीय सलामीची जोडी अपयशी ठरत असल्याने विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामीला आला. दोघांनी धमाकेदार खेळी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. रोहित सुपरहिट प्रमाणे आपल्या रंगात आला होता आणि इंग्लंडच्या फलंदाजांचा घाम काढत होता. मात्र रोहित नावाच्या वादळाला बेन स्टोक्सने माघारी धाडलं. मात्र त्यानंतर इंग्लिश संघाची अवस्था आगीतून फुपुट्यात पडल्याप्रमाणे झाली.

रोहित बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सुर्यकुमाने आपल्या दुसऱ्या चेंडूत षटकार ठोकला. सुर्यकुमारने आपला दांडपट्टा चालू ठेवला होता. आदिल रशिदला तर तो खेळवून खेळवून मोठे फटके मारत होता. सुर्यकुमारने त्याच्या ठेवणीतले काही आकर्षक फटकेही मारत आपली क्षमता पुन्हा दाखवून दिली. सुर्या मोठी खेळी करणार असं वाटत होतं मात्र रशिदच्या चेंडूवर मारलेल्या एका फटक्यावर ख्रिस जॉर्डनेन घेतलेला अफलातून झेलने सुर्यकुमारच्या खेळीला ब्रेक लागला.

दरम्यान, जॉर्डनेन धावत जात आपल्या एका हातात चेंडू पकडला त्यानंतर आपला संतुल सांभाळत चेंडू रॉयकडे फेकला. या सर्वामध्ये त्याच्याकडे वेळ कमी होता. मात्र त्याने घेतलेला सुरेख झेल डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत पवारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती- परमबीर सिंह

मुख्यमंत्र्यानी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी- अनिल देशमुख

“आता कळलं का?,वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता”

“आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता”

“100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, गृहमंत्र्यांसोबत त्यांनीही राजीनामा द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More