बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंचं आणि शिवसेनेचं काय आहे जुन नातं?, मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई | सध्या राज्यभर मनसुख हिरेन यांचं प्रकरण चर्चेत आहे. मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा अचानक तपासादरम्यान मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलीस दलातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचं नाव समोर येत आहे. य़ा प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या पत्नीनेही थेट सचिन वाझेंवर आरोप केले आहेत. त्यामुळे विरोधकांनीही त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव येत आहे ते अधिकारी शिवेसेनेते कार्यकर्तेही होते. सचिन वाझे 2008 साली शिवसेनेत होते त्यानंतर त्यांनी आपलं सदस्यत्व रिन्यू केलेलं नाही. त्यामुळे त्यांचा आता शिवनसेनेशी काही संबंध राहिला नाही. मात्र विरोधी पक्षाकडून त्यांना टार्गेट केलं जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

डेलकर प्रकरणात तर भाजपचा मंत्री आहे. सचिन वाझे तर मंत्री नाही. पक्षपातीपणे का बघताय?, सचिन वाझेला का लटकवताय?, एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून असं म्हणत ठाकरेंनी अर्णब गोस्वामीचं नाव घेत निशाणा साधला.

दरम्यान, सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जात असून कोणत्याही गुन्ह्यात आधी फाशी अन् नंतर तपास असं करता येत नाही, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

‘सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

जागतिक अंतिम कसोटी सामना ‘लाॅर्डस’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणा

“जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प”

बंगळूरच्या ‘या’ आज्जी ठरल्या कोरोनाची लस घेतलेल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More