मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी वाराणसीमध्ये देव दिवाळीचा उत्सव साजरा केला. मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतलं. यासंदर्भात मोदींनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मोदींवर निशाण साधला आहे.
शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. जगतापांनी मोदींना उपहासात्मकपणे हा टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये वाक्य पुर्ण झाल्यावर एक रागीट इमोजी आणि डाऊन थम्ब टाकला आहे. याच मुद्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश सिंग यांनीही टीका केली आहे.
दरम्यान, शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी ते निदर्शन करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी वाराणासीमध्ये संगीतीचा आनंद घेत मान डोलावत असल्याचं अखिलेश सिंग यांनी म्हटलं होतं.
शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच 😡👎🏿
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) December 2, 2020
महत्वाच्या बातम्या-
अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन
शीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी धक्कादायक माहिती समोर!
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात!
“दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला”
रजनीकांत अखेर राजकारणात, ‘या’ दिवशी करणार पक्षाची घोषणा!
Comments are closed.