चंद्रपूर महाराष्ट्र

आमचा मान राखला जात नाही; ठाकरे सरकारमधील आमदाराने केली मंत्र्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

मुंबई | ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री आमचा मान राखत नाहीत शिवाय काँग्रेस आमदारांची कामं होत नाही. महत्वाच्या फाइल्स अडवून ठेवतात, असं म्हणत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसच्या आमदारांचा मानसन्मान ठेवत नाही. कृपया त्यांना आमदारांचा सन्मान राखण्याची समज द्यावी, अशी मागणी सुभाष धोटे यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. या दरम्यान आमदार महोदयांनी ही तक्रार केली आहे. या चर्चेच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते.

दरम्यान,व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीचा व्हिडीओ आमदार धोटे यांनी स्वत: समाज माध्यमावर सार्वजनिक केल्याने काँग्रेस आमदारांची नाराजी अतिशय उघडपणे समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“कारसेवकांनी नाही, तर आम्हीच बाबरी पाडली हे सांगण्याचं धाडस भाजप का दाखवत नाही?”

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा

गल्लीतून आला दुर्गंधीचा वास, बंद खोलीच दार उघडताच….

कोरोना नाही म्हणून मारला बोकड पार्टीवर ताव, आता चुपचाप झालंय गाव!

…तर लॉकडाऊनच नाही सोबत कडक कर्फ्यू लावेन- तुकाराम मुंढेंचा नागपुरकरांना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या